
मंडणगड : यशतेज फाउंडेशन मंडणगड यांच्यावतीने तालुक्यातील शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा महात्मा गांधी लायब्ररी मंडणगड येथे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 11 जुलै 2025 रोजी इंग्रजी व मराठी विषयात विशेष प्राविण्य मिळवून शिष्यवृत्तीधारक ठरलेली उत्कर्षा जोशी (इंग्रजी विषय) आर्वी कोकाटे (मराठी विषय) या विद्यार्थ्यांनीचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास सोहळ्यास मंडणगड शहरातील मान्यवर नागरिक आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तिमत्त्वे मोठ्या संख्येने उपस्थित राहिली होती.
यावेळी लेखक भाऊसाहेब टूले, गटविकास अधिकारी विशाल जाधव, राजेश इंगळे, श्रीकांत जाधव, कौस्तुभ जोशी, नंदू गांगण, विलास थोरे, शंकर जंगम, किरण साखरे, चारुलता पारेख मॅडम, देवयानी करमरकर मॅडम, ॲड. हर्षल तुळसणकर, ॲड. आदित्य सुळे, ॲड. सुमेश घागरूम, ॲड. शोभा प्रजापती , दीपिका घोसाळकर, डॉ. अरुण ढंग, अनविक कदम, मृणालीने हुंबरे मॅडम, स्नेहल वसावे, वृषाली पोतनीस, जुई घोसाळकर, सलोनी राठोड, बशीद मुकादम, मंदार शेलार, राहुल राठोड, साहिल सावंत, अभिजीत म्हापळलकर उपस्थित होते. सत्कार प्रसंगी विद्यार्थ्यांनींना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्यांचे शैक्षणिक यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.