
सावर्डे : स्वच्छता मानवी जीवनाच्या मुलाधार आहे. स्वच्छ जीवन सुंदर असते. विद्यार्थ्यांनी वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे कारण प्रत्येक आजारा अस्वच्छतेमुळे बळावत असतो. त्यामुळे आजार बरा करण्याच्या प्रयत्न पेक्षा तो आजार होणारच नाही यासाठी स्वच्छता पाळा व जनजागृती करा असे जी. एस. टी कन्सल्टट सी.डी .सापते यांनी केले. सह्याद्री संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे विद्यालयात नुकताच गांधीतीर्थ स्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छता दूतांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता .
विद्यार्थ्यांना स्वच्छतेची सवय लागावी. सफाई करणे हे कमीपणाचे नसून ते सुद्धा एक प्रतिष्ठित लक्षण आहे, याची जाणीव व्हावी म्हणून सावर्डे ग्रामपंचायतीचे सफाई कामगार वैभव सखाराम कदम ,सुरज काशीराम भुवड,विनोद प्रमोद जाधव यांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुंदर गाव स्वच्छ गाव ही संकल्पना या सफाई कामकारांच्या योगदानामुळे परिसरात अतिशय काळजीपूर्वक राबवली जात आहे .स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना समजणे आवश्यक असल्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे , उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.