गौरव शिर्के यांचा सन्मान

Edited by: विनायक गांवस
Published on: February 20, 2025 15:49 PM
views 257  views

सावंतवाडी : दशावतार क्षेत्रातील युवा कलावंत, युवा राजा, जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ सावंतवाडी या मंडळात प्रमुख राजपात्राची भुमीका साकारणारा व महापुरुष दशावतार नाट्य मंडळ सावंतवाडीचे मालक गौरव अजय शिर्के यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

राष्ट्रीय पर्यावरण संरक्षण बहुउद्देशीय सामाजिक संस्था ठाणे यांच्या वतीने ठाणे येथे अध्यात्मीक सन्मान पुरस्कार, ज्ञानसागर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कोल्हापूर यांच्या वतीने कोल्हापुर येथे लोकरत्न प्रतीभा भुषण पुरस्कार, कला पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समीती महाराष्ट्र व मोकळा श्वास सामाजीक विकास संस्था सातारा यांच्यावतीने सातारा येथे कला जिवन गौरव राष्ट्रीय पुरस्कार व ईमेज इंटरनेशनल रिसर्च असोशीयन गोवा व राष्ट्रीय प्रधान मुखीया संघ नवी दिल्ली यांच्यावतीने गोवा येथे भारत युवा गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. सर्व क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.