रक्तदाता दिनी सन्मान 'रक्तमित्रां'चा

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, विशाल सेवा फाउंडेशनचा अभिनव उपक्रम
Edited by: विनायक गावस
Published on: June 14, 2023 20:02 PM
views 150  views

सावंतवाडी : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी विशाल सेवा फाउंडेशन सिंधुदुर्गच्या विद्यमाने जागतिक रक्तदाता दिनानिमित्त रक्तदात्यांचा भव्य सत्कार राणी पार्वती देवी हायस्कूलमध्ये करण्यात आला. विविध सामाजिक संस्था, मित्रमंडळ यांसह रक्तदान चळवळीत कार्यरत रक्तमित्रांचा सन्मानन मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. या दिवसाच औचित्य साधून बुधवारी सकाळी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होत.

दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुनिल राऊळ यांनी संकल्पना मांडत सिंधू रक्तमित्र संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. युवराज लखमराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष संजू परब, युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते विविध सामाजिक संस्था, मित्रमंडळ यांसह रक्तदान चळवळीत कार्यरत रक्तमित्रांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी युवा उद्योजक विनायक कोडयाळ तसेच सर्व शिबिरांमध्ये सक्रीय सहभाग घेणारे प्रतिष्ठानचे खजिनदार सिद्धार्थ पराडकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तर गोवा-बांबोळी रुग्णालयाच्या रक्तपेढीने रक्तदाता दिनानिमित्त सिंधुमित्र रक्त प्रतिष्ठानला सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन आभार मानले. प्रतिष्ठानचा हा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 

याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर म्हणाले, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान गेली ३५ वर्ष समाजात कार्यरत आहे. रक्तादानाचा विचार  रूजविण्याच कार्य सहकार्याचा माध्यमातून आम्ही केलं. आम्ही त्या क्षणाची वाट पाहत आहोत ज्या दिवशी रक्तासाठी एकही फोन सिंधू प्रतिष्ठानला येणार नाही‌. गावागावात घराघरात रक्तदानाची जागृती होऊन रक्तदान करून आलो असं समाजाकडून सांगितल जाईल अशा दिवसाची आम्ही वाट पाहत आहोत. त्यासाठी रक्ताची जागृकता होण आवश्यक आहे. प्रत्येकास रक्तगट ठाऊक असण आवश्यक आहे. त्यासह एकही रक्तपेढी रिक्त असता नये हे स्वप्न आम्ही पाहत आहोत. आमचं अभियान हे मानवतावादी अभियान आहे. समाजासाठी रक्त देणाऱ्यांचा गौरव समाजाच्यावतीने व्हावा यासाठीच आजचा दिवशी हा सन्मान करण्यात येत आहे.


मनोगत व्यक्त करताना माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, समाजात अनेक कार्यक्रम होत असतात पण जे रक्तदानासारखं पवित्र कार्य करतात त्यांचा सत्कार करणं हा चांगला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा भाग व्हायला मिळालं हा माझा सन्मान आहे. रक्तदानासारख्या कोणत्याही कार्यक्रमाना कधीही हाक दया, आम्ही सोबत आहोत. आम्ही राजकारणी माणसं केवळ स्वत:साठी व स्वतःच्या पक्षासाठी काम करीत असतो. या संस्थेचं कार्य पाहून मलाही अशी एखादी संस्था काढावी असं वाटतं. मात्र, आम्हाला ते नक्कीच शक्य नाही. कारण, तुमच्या सारखं काम करणं हे मूळातच रक्तात लागतं. असं असलं तरीही ज्या ज्या वेळी या संस्थेला सहकार्याची गरज लागेल त्यावेळी मी संपूर्ण सहकार्य करीन अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.

रक्तदानाच खरं महत्व हे पोलीस व डॉक्टर यांनांचं खऱ्या अर्थाने माहीत असतात. जेव्हा अपघात होतात त्यावेळी रक्तदात्यांची फार मोठी गरज असते. अशावेळी रक्तदाते शोधण्यात वेळ जातो व अपघातग्रस्त रुग्णाचा जीव जाण्याची भिती असते. मात्र, सिंधुरक्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे मिशन सुरू आहे त्या माध्यमातून भविष्यात असे प्रसंग उद्भवणार नाहीत व अपघातग्रस्तांचे जीव वाचवू शकू याची नक्कीच खात्री आहे असे उद्गार निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस यांनी काढले.

यावेळी प्रमुख अतिथी युवा उद्योजक विशाल परब म्हणाले,  सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचं कार्य हे अनमोल आहे. रक्तदान हे खूप मोठं कार्य आहे. हा उपक्रम न भूतो न भविष्यति आहे. हे मोठं पुण्याचं काम आहे. अपघात होतात अशा वेळी रक्ताची गरज असते. अशावेळी रुग्णाचे नातेवाईक खूप अस्वस्थ असतात. त्यांना खूप तळमळ करावी लागते. त्यामुळेच अशा संस्थांना लागेल तेवढी मदत करण्यास तयार आहे. माझ्या कमाईतील १० टक्के भाग हा समाजासाठी देणार आहे.

पूढील वर्षी हाच विश्वदाता कार्यक्रम १ हजार रक्तदात्यांचा कार्यक्रम होईल. त्यासाठी लागेल तेवढी सर्व मदत करायला मी व माझे सर्व सहकारी नक्कीच करीन अशी ग्वाही विशाल सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल परब यांनी दिली. तर समाजासाठी काम करणारा व्यक्ती म्हणून सुनिल राऊळ यांच्याकडे आम्ही लहानपणापासून पहात आलोय असं मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचा अध्यक्षीय भाषणात युवराज लखमराजे भोंसले यांनी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले. सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानने कोरोनाच्या काळात या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर मागील तीन वर्षात त्यांनी केलेलं कार्य नक्कीच खूपचं महान आहे. त्यांच्या या कार्यात सहभागी होण्यात नक्कीच आनंद वाटेल. भविष्यात आपण सर्वांनी मिळून जर एकत्रितपणे काम केलं तर नक्कीच त्यात अधिक यश येईल. आमच्या श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची मदत लागेल तेव्हा नक्कीच करु. रक्तदानातून आपण एखाद्याचे जीवन वाचवत असतो. काही वर्षांपूर्वी संस्थानच्या राजमातांना दूर्मिळ रक्तदात्याची गरज पडली होती. त्यावेळी आमच्या कॉलेज परिवारातील विद्यार्थ्यांनी रक्तदान करून मदत केली होती. आता तर आपला हा परिवार खूपच मोठा आहे. या परिवाराच्या माध्यमातून भविष्यात रक्तदानाचं हे महान कार्य असचं पुढे नेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करीन, अशी ग्वाही कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे सावंत भोंसले यांनी दिली.

याप्रसंगी युवराज लखमराजे सावंत-भोंसले, माजी नगराध्यक्ष संजू परब, युवा उद्योजक विशाल परब, सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर, तालुकाध्यक्ष सुनिल राऊळ, किशोर नाचणोलकर, निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस, सुधीर पराडकर, आनंद वेंगुर्लेकर, डॉ. आव्हाळे, डॉ अमित आवळे,डॉ येडके, संदीप चांदेकर, सावंतवाडी - दोडामार्ग तालुका  विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर,कार्याध्यक्ष दीपक तारी, तालुका सचिव बाबली गवंडे, खजिनदार सिद्धार्थ पराडकर,एकनाथ चव्हाण, सागर नाणोसकर, महेश रेमुळकर,

नारायण नाईक,योगेश सावंत,साक्षी कारीवडेकर,निलेश मोरजकर,शिवम बोंद्रे आदी उपस्थित होते.