
वेंगुर्ला:
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून वेंगुर्ले येथे शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छता दूत महिला कर्मचारी, महिला शेतकरी व बागायतदार, वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर तसेच महिला विभागातील आरोग्य कर्मचारी, वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी व महिला कर्मचारी त्याचबरोबर वेंगुर्ला पोलीस स्थानकातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान बुधवारी (८ मार्च) करण्यात आला.
वेंगुर्ला शिवसेना यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून शहरात व तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, महिला तालुकाप्रमुख श्रद्धा परब- बाविस्कर, महिला विभागीय संघटक सायली आडारकर यांच्यावतीने शहरातील विविध क्षेत्रातील शेतकरी सरकारी कर्मचारी डॉक्टर आरोग्य अधिकारी पोलीस व स्वच्छता दूत नगरपालिका कर्मचारी अशा शंभर महिलांचा सत्कार भेटवस्तू देऊन करण्यात आला.
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छ सुंदर पर्यटन क्षेत्र कंपोस्ट गार्डन येथे नगरपरिषदेच्या कार्यालयीन प्रमुख संगीता कुबल, महिला बचत गट विभागाच्या प्रमुख निशा आळवे यांच्यासाहित नगरपालिका स्वच्छता दूत महिला कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नाली पवार, आरोग्य महिला अधिकारी पी पी आरावंज सुखदा पेडणेकर, संजना मोचेमाडकर, प्रणाली साळगावकर, प्राजक्ता राठोड यांच्यासह अन्य महिला कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकरी महिला, बागायतदार यांचा बांधावर जाऊन सन्मान करण्यात आला.
याबरोबरच वेंगुर्ला तालुका कृषी कार्यालय व वेंगुर्ला पोलीस स्थानकातील महिला अधिकारी व कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात आला. शहर प्रमुख उमेश येरम व जिल्हा संघटक सचिन वालावलकर यांच्या संकल्पनेतून आज महिलादिनी हा सन्मान करण्यात आला.