वानिवडे गावचा पालकमंत्राच्या हस्ते सन्मान !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: February 25, 2024 11:11 AM
views 300  views

देवगड : वानिवडे ग्रामपंचायतीचा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व आर.आर ( आबा ) पाटील सुंदर गाव स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे .

यावेळी वानिवडे सरपंच सुयोगी घाडी, ग्रामसेविका मनिषा पाटील , डाटा ऑपरेटर स्वप्नाली मासये , स्वच्छता कर्मचारी संदेश मासये आदी  मान्यवरांनी हा सन्मान स्वीकारला .

देवगड तालुक्यातील वानिवडे गावाने गावात स्वच्छतेबाबत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असुन त्यात त्यांनी सातत्य राखले आहे. अनेक योजना गावात राबवत असून अभियानातही सहभाग घेत आहे . सन २o१९-२० संत गाडगेबाबा जि.प गटात प्रथम क्रमांक व आर .आर ( आबा ) पाटील सुंदर गाव स्पधेत तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त करत वानिवडे गावाने आपला वेगळा ठसा उमटवला आहे . या यशाबद्दल गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनीही कौतुक केले.