बाबाजी पांडुरंग गावकर यांचा श्री सटीदेवी महालक्ष्मी देवस्थान समितीच्यावतीने सन्मान

मांद्रे मतदार संघाचे आमदार जित आरोलकर यांच्याहस्ते झाला सन्मान
Edited by:
Published on: May 20, 2023 15:24 PM
views 118  views

     पेडणे नजिक तुये - मुरमुसे येथील श्री सटीदेवी महालक्ष्मी मंदिर जिर्णोद्धार कामात सहकार्य केल्याबद्दल ओटवणे येथील बाबाजी पांडुरंग गावकर यांचा श्री सटीदेवी महालक्ष्मी देवस्थान समितीच्यावतीने सन्मान करण्यात आला. श्री सटीदेवी महालक्ष्मी पुन:प्रतिष्ठापना सोहळ्यात गोवा हाऊसिंग बोर्ड कार्पोरेशनचे चेअरमन तथा मांद्रे मतदार संघाचे आमदार जित आरोलकर यांच्याहस्ते बाबाजी गावकर यांना शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

      या सत्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर पै काणे कंपनीचे संचालक सुनिल पै काणे, उत्सव समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रंगनाथ कलशावकर, तुये ग्रामपंचायतच्या सदस्या अनिता साळगावकर, श्री सटीदेवी महालक्ष्मी देवस्थान समितीचे अध्यक्ष सचिन कोचरेकर, सचिव सुदेश नाईक, बांधकाम समिती अध्यक्ष सुभाष साळगावकर, सचिव कृष्णा तळवणेकर, मार्गदर्शक लक्ष्मण खरवत आदी मान्यवर उपस्थित होते.

        ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा माजी उपसरपंच असलेले बाबाजी गावकर ओटवणे देवस्थानचेही मानकरी आहेत. बाबाजी गावकर यांनी श्री सटीदेवी महालक्ष्मी मंदिर जिर्णोद्धार कामात श्री सटीदेवी महालक्ष्मी देवस्थान समितीला वेळोवेळी मार्गदर्शन केले. त्यामुळे त्यांच्या या सहकार्याबद्दल श्री सटीदेवी महालक्ष्मी देवस्थान समितीच्यावतीने बाबाजी गावकर यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरेश नाईक यांनी तर आभार रावजी जाधव यांनी मानले.