
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांनी चालवलेली 'प्रयाण' महीला पर्यटन संस्था, सावंतवाडी यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमीत्त महिलांना प्रोत्साहित करण्याकरता दिनांक १७ ऑक्टोबर २०२३ (मंगळवार) रोजी इंदिरा गांधी व्यापारी संकुल सभागृहामध्ये सायंकाळी ४ .०० ते ५.३० या वेळेत विविध क्षेत्रात चांगले कार्य करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. महिलांना पर्यटन विषयी सूचना अथवा मार्गदर्शन करायचे असेल तर त्यांना संधी दिली जाणार आहे. तसेच पर्यटन संबधी प्रसाद नाडकर्णी माहिती देणार आहेत.
या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त महिलांनी उपस्थित रहावे अशी विनंती प्रयाण महीला पर्यटन संस्था अध्यक्ष अपर्णा प्रशांत कोठावळे, उपाध्यक्ष श्रीमती आनारोजिन लोबो व सचिव श्रीमती मार्सेलिना डिसोझा तसेच दीपक केसरकर मित्र मंडळ यांनी केले आहे.