पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा देवगड पत्रकार समितीच्यावतीने सत्कार

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 12, 2023 11:40 AM
views 141  views

देवगड : पत्रकारांच्या १० वी व १२ वी मध्ये नेत्रदीपक यश संपादन केलेल्या मुलांचा देवगड तालुका पत्रकार समितीच्या वतीने शिरगाव विभागातील मुलांचा सत्कार करण्यात आला.

   यावेळी  अजिंक्य साटम ( इ. १२ वी ), ऋग्वेद साटम ( इ. १० वी )  या मुलांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर, जिल्हा पत्रकार कार्यकारणी सदस्य राजेंद्र मुंबरकर, पत्रकार संतोष कुलकर्णी, राजेंद्र साटम, संतोष साळसकर, श्रीकृष्ण रानडे, दिनेश साटम, गणेश आचरेकर आदी पत्रकार तसेच सौ. स्नेहल साटम, श्रीमती संगीता साटम, विश्वजित साटम आदी मान्यवर उपस्थित होते.