सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांचा सन्मान

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने फुलचंद मेंगडे यांना सन्मान चिन्ह व शाल देऊन गौरव
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 27, 2022 11:24 AM
views 725  views

सावंतवाडी : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्यावतीने सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना सन्मान चिन्ह व शाल देऊन गौरविण्यात आले. पोलिस निरीक्षक यांच्या कामाची दखल घेत हा गौरव करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी समीर परब,जिल्हा सरचिटणीस राकेश केसरकर,जिल्हा महीला अध्यक्षा सौ.दर्शना केसरकर, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद धुरी, जिल्हा सचिव ऍड.मोहन पाटणेकर, सोशल मीडिया प्रमुख आनंद कांडरकर,सदस्य विष्णू चव्हाण,व्यापारी सेल जिल्हाध्यक्ष बाळा कोरगांवकर ,तालुका अध्यक्ष नाईक उपस्थित होते.