युवा रक्तदाता संघटनेचा सन्मान..!

Edited by: विनायक गावस
Published on: February 21, 2024 14:28 PM
views 77  views

सावंतवाडी : सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्था ,संचलित  सेंट्रल इंग्लिश स्कूलचे २८ वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले. या वार्षिक स्नेहसंमेलनात रक्तदान चळवळीत सक्रिय सहभाग असलेल्या युवा रक्तदाता संघटनेचा सन्मान करण्यात आला.

रक्तादन चळवळीत कार्याबद्दल युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष दुर्गेश रमेश सुर्याजी व सदस्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. यावेळी मेहर पडते, अनिकेत पाटणकर, अर्चित पोकळे, संदीप निवळे, वैभव सावंत, वैभव दळवी, देवेश पडते, सुरज मठकर, साईश निर्गुण, शुभम बिद्रे आदींचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी माजी शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर, सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष  इम्तियाज खानापुरी,संस्थेचे उपाध्यक्ष. नासिर शेख ,उपाध्यक्षा. निलोफर बेग ,सचिव हिदायतुल्ला  खान , सहसचिव .सुलेमान बेग ,सदस्य .रिझवान पटेल , रफिक शेख, मुश्ताक बागवान , समीर बागवान, श्री परवेज बेग , श्रीम. अलिझा खान , खलील खान असे मान्यवर उपस्थित होते.