
वेंगुर्ले : ग्रामपंचायत परुळे बाजारला क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत म्हणुन पंचायत समिती वेंगुर्ला येथे गटविकास अधिकारी दिनेश पाटकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय क्षयरोग दुरि करण कार्यक्रम अंतर्गत क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत साठी नुकतेच मूल्यमापन करण्यात आले.
यावेळी विस्तार अधिकारी सच्चिदानंद परब यासह सरपंच प्रणिती आंबडपालकर, ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे, आरोग्य समुदाय अधिकारी वैष्णवी पाटकर, काजल परब, आशा सेविका रक्षिता गोवेकर, कोमल मांजरेकर, राजलक्ष्मी परुळेकर आदी उपस्थित होते.
या पुरस्काराचे खरे मेहेनत घेतली. तसेच ग्रामस्थांन मार्गदर्शन करणे त्यांच्या मनातील आजार विषयक गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न केले. परुळे बाजार ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवक मनोज दूधवडकर, शिवाजी चव्हाण आरोग्य समुदाय अधिकारी व आरोग्य सेविका आर. आर. पिंगुळकर यांनी, सर्वांच्या एकत्रित प्रयत्न मुळे हे यश मिळाले असे मत सरपंच यांनी व्यक्त केले.