
वैभववाडी : संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबडेकरांबद्दल संसदभवनामध्ये अविवेकी वक्तव्य करणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा राष्ट्रपतींनी राजीनामा घ्यावा अशी मागणी तालुका बौध्द सेवा संघाच्यावतीने करण्यात आली. याबाबतच निवेदन तालुका बौध्दसेवा संघाच्यावतीने २६ डिसेंबरला तहसिलदार सुर्यकांत पाटील यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना दिले आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी संसद भवनामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अविवेकीपणे वक्तव्य केले आहे. त्या वक्तव्याचा जाहीर निषेध वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघाने केला. श्री.शहा यांनी केलेले वक्तव्य बाबासाहेबांचे अवमान करणारे आहे. त्यामुळे राष्ट्रपततींनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील बौध्द सेवा संघाने केली आहे. यावेळी रवींद्र पवार, मंगेश कांबळे, अर्जुन कदम, सचिन भोसले, अजित कदम, प्रवीण भोसले, प्रितमम जाधव, आदी उपस्थित होते.