होळी रे होळी | कनेडी बाजारात 'त्या' गोमूच्या नाचाची चर्चा

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 26, 2024 09:04 AM
views 5091  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून गावा गावात व वाडी वस्तीत गोमूचे नाच सुरू झाले आहेत. आज कणकवली तालुक्यातील कनेडी बाजारामध्ये महिलेचा वेश परिधान केलेल्या एकाने वेगवेगळ्या मराठी हिंदी गाण्यांवर ठेका धरला होता. यावेळी सर्वजण गाण्याच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हा नाच पाहत असताना दिसले. त्यामुळे कनेडी बाजारासह आजूबाजूच्या गावांमध्ये या गोमू च्या नाचची भुरळ प्रेक्षकांमध्ये दिसत होते.