सर्वोदय नगरमध्ये होळी उत्साहात साजरी

Edited by:
Published on: March 16, 2025 14:34 PM
views 61  views

सावंतवाडी : सर्वोदय नगर शिक्षक कॉलनी येथे होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रात्री होळी मातेची विधीवत पूजा करून नागरिकांतर्फे श्रीफळ अर्पण करण्यात आले. त्यानंतर होळी पेटवण्यात आली.

प्रारंभी ज्येष्ठ विजय कुमार मुरगूड सर आणि सिद्धेश नेरुरकर यांनी पूजा करून होळी मातेला गाऱ्हाणे घातले. त्यानंतर सर्व नागरिकांनी पूजा करून होळी पेटवली, याप्रसंगी संभाजी तथा भाई नाईक, गजानन नाईक ,रमेश भोसले,सौ. वैशाली भोसले, स्नेहा रेडकर, सतीश नाईक, सौ.माधुरी नाईक, सौ.रोशनी गावडे, रघुनाथ गवस, गणपती काळकुंद्रीकर, धनंजय राऊळ, तानाजी पालव, उमेश काळकुंद्रीकर, दिशा कामत, गुरुदत्त कामत, कविता नाईक नेरूरकर, पूनम नाईक, निनाद नाईक, बारदेशकर, अतुल पाटील, प्रदीप शिरसाट, छाया पालव, अनुश्री राणे, स्मिता नाईक, सुजाता पाटील, अमित नाईक, रुद्राक्ष भोसले, आणि छोटी मुले मोठ्या संख्येने उपस्थित होती. होळी  पेटवल्यानंतर प्रसादाने सांगता करण्यात आली. दिशा कामत यांनी होळी उत्सव नियोजनाबद्दल आयोजकांना धन्यवाद दिले.