मराठा - धनगर आरक्षणाकरीता संसदेचं विशेष अधिवेशन घ्या

खा. विनायक राऊत यांची पंतप्रधानांकडे मागणी
Edited by: संदीप देसाई
Published on: October 28, 2023 19:16 PM
views 127  views

सिंधुदूर्ग : महाराष्ट्रातील मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाकरीता संसदेचे विशेष अधिवेशन तात्काळ घेण्याबाबत शनिवारी 28 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खासदार व शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केली निवेद्वानाद्वारे विनंती केली आहे.

संपुर्ण महाराष्ट्रात मराठा व धनगर बांधव समाजाच्या आरक्षणासाठी अत्यंत शांततेत आंदोलन करत आहेत. आता तर मनोज जरांगे पाटिल यांच्या समवेत राज्यातील गावा गावात उपोषण आंदोलने सुरू झाली आहेत. मात्र अद्यापही मराठा बांधवांना न्याय मिळालेला नाही तर राज्याच्या डोंगर दऱ्यात विस्थापित असलेल्या धनगर बांधव सुद्धा आरक्षणासाठी लढा देत आहेत. त्यांचाही प्रश्न कायम आहे. महाराष्ट्र वगळता अन्य काही राज्यात हे आरक्षण लागू झाले आहे. 

ही सर्व परिस्थिती लक्षात घेता सरकार महाराष्ट्र मध्ये मराठा व धनगर समाज बांधवांची सामाजिक आरक्षण मागणी पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याने आपल्या नेतृत्वाखाली आपण संसदेच विशेष अधिवेशन बोलावून या दोन्ही समाज घटकांना न्याय द्यावा अशी मागणी खासदार राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.