
कुडाळ : शिवगर्जना महानाट्याच्या कालच्या तुफान गर्दी नंतर आज सुद्धा या नाटकाचा प्रयोग हाउसफुल होणार आहे. आज शनिवार आणि उद्या रविवारचे दोन्ही प्रयोग हे हाउसफुल होणार आहेत. त्यामुळे कालच्या तोबा गर्दी नंतर शनिवार व रविवारच्या दोन्ही प्रयोगांना फार मोठी गर्दी उसळणार आहे. शिवगर्जना महानाट्याचा कालचा प्रयोग हा प्रचंड हाऊसफुल झाला होता.
सुमारे 70 ते 80 हजार पेक्षा जास्त लोकांनी एकाच वेळी नाट्यप्रयोग बघितला होता. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी, कर्नाटक आदी भागातून मोठ्या प्रमाणात हे नाटक बघण्यासाठी लोक कुडाळात दाखल झाले होते. खास लोकांच्या मागणीस्तोव या महानाट्याचे आजून दोन प्रयोग होणार आहेत.अजून दोन दिवस शो वाढवण्यात आले असून आज शनिवार 18 मार्च व रविवार 19 मार्च असे दोन जादा शो होणार आहेत. तरी प्रेक्षकांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन विशाल सेवा फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग च्या वतीने विशाल परब यांनी केले आहे.