इनरव्हील क्लबच्यावतीने सावंतवाडी एसटी बस स्थानकावर 'हिरकणी कक्ष' !

Edited by: विनायक गांवस
Published on: March 09, 2024 14:39 PM
views 63  views

सावंतवाडी : महिला दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्या सौजन्याने सावंतवाडी एसटी बस स्थानकावर "हिरकणी कक्ष" बांधून देण्यात आला. यावेळी इनरव्हील क्लब सावंतवाडी अध्यक्ष सौ. रिया रेडीज यांनी बस स्थानकावर लहान मुलांना गरजेची असलेली स्तनपान व्यवस्था करून स्त्रियांनी स्त्रियांच्या अडचणी आणि गरज पूर्ण झाल्याने समाधान व्यक्त केले.

या उद्घाटन प्रसंगी डेपो मॅनेजर श्री. गावित, इनरव्हील अध्यक्ष सौ.रिया रेडीज,सेक्रेटरी डॉ .मीना जोशी, सुमेधा धुरी ,मृणालिनी कशाळीकर,भाग्यश्री कशाळीकर,शकून मापसेकर, श्रेया नाईक,सौ देसाई ,सौ शहापूरकर, सौ बाबर देसाई , रोटरियन सातोसकर, प्रवीण परब, उजगावकर ,राजेश रेडीज उपस्थित होते.यावेळी लेडी कंडक्टर आणि लेडी पोलीस यांचा फुल देऊन सत्कार करण्यात आला.