हिराबाई जाधव - चव्हाण गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सन्मानित

Edited by:
Published on: June 05, 2025 15:54 PM
views 292  views

मुंबई : प्रा . आ. केंद्र कसाल, उपकेंद्र कुसबे येथील आरोग्य सेविका हिराबाई जाधव/चव्हाण यांना नुकतेच यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2025 अंतर्गत राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र शासन दरवर्षी जिल्हा परिषद स्तरावर उत्कृष्ठ काम करणाऱ्या गुणवंत अधिकारी, कर्मचारी यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करते. कोंकण विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य विभागातून सन 2023- 24 या वर्षी हिराबाई जाधव - चव्हाण आरोग्य सेविका यांची निवड झाली होती. 

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल महामहीम सी. पी. राधाकृष्णन आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार  हिराबाई जाधव - चव्हाण आरोग्य सेविका यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले. राज्यस्तरावरून मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांचे जिल्हा व तालुका स्तरावरून अभिनंदन होत आहे.