
देवगड : गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष स्वागत शिरगाव गावातील सर्व तरुणाई आणि महिला यांनी एकत्रित ग्रामदैवत श्री.पावणाई देवी मंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी मोटरसायकल रॅली काढून नवीन वर्षाचे भव्य स्वागत करण्यात आले. यामध्ये असंख्य महिला आणि तरुण एकत्र झाले होते. यावेळी महाराजांच्या आणि मराठी अस्मितेच्या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला. यानिमित्ताने सर्वत्र नवचैतन्य आणि उत्साह पाहायला मिळाला.










