
कणकवली : आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडियम स्कूल नडगिवे मध्ये 14 सप्टेंबर राजभाषा हिंदी दिवस साजरा करण्यात आला. राजभाषा दिनानिमित्त साहित्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजभाषा गौरव गीत सादर करण्यात आले. या गीताला शाळेतील संगीत शिक्षक हेमंत तेली यांनी साथ दिली.यानंतर इयत्ता पाचवीतील कांचन अडुलकर ,इयत्ता सहावीतील सिया कदम ,इयत्ता सातवीतील आयेशा पटेल, आठवीतील विद्यार्थिनी नबिहा काझी, इयत्ता नववीतील विद्यार्थी पहाद सारंग यांनी हिंदी दिनाचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या. इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी अमिना पटेल हिने हिंदी भाषेचे महत्त्व सांगणारी कविता सादर केली.
हिंदी विभाग प्रमुख प्रतिभा राऊत यांनी राजभाषा हिंदी विषयी इतिहास कथन केला तसेच हिंदी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या .प्रशालेचे मुख्याध्यापक कौस्तुभ देसाई यांनी हिंदी दिनाच्या शुभेच्छा देऊन सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाची सांगता हिंदी विषय सहाय्यक शिक्षक ओंकार गाडगिळ यांच्या भाषणांनी झाली.संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.