
सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे आयनोडे ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच साक्षी संदीप देसाई व दोडामार्ग तालुका हेल्पलाइन ग्रुपचे अध्यक्ष वैभव इनामदार यांच्यासह तळेखोल येथील शेकडो कार्यकर्त्यांनी सावंतवाडीत भाजपा संघटन पर्व बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा अध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, दोडामार्ग तालुका अध्यक्ष सुधीर दळवी ,जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी हे उपस्थित होते.हेवाळे सरपंच साक्षी देसाई यांच्या सह ग्रा.प.सदस्या जान्हवी जनार्दन खानोलकर, भीमाबाई भीमराव राणे, विनिता विठ्ठल गवस, सर्वदा सत्यवान गवस, वसुंधरा वासुदेव गवस ,महंतराव जयवंतराव देसाई ,इंजिनिअर स्वप्निल देसाई आदीनि भाजपा प्रवेश केला.
तसेच वैभव इनामदार यांच्यासह युवा कार्यकर्ते राजू ठाकूर आई, दयानंद गवस हेवाळे, पुनाजी गवस पिकुळे शैलेश गावडे, संदेश गवस शीरंगे सुशील गवस आंबेली कृष्णा दळवी ,रवींद्र खडपकर, अमित भिडे साटेली भेंडशी लक्ष्मण उर्फ बाबा मयेकर रामकृष्ण दळवी तळेखोल आदींनी भाजपा प्रवेश केला.