हेत सरपंचाचे स्वातंत्र्यदिनी उपोषण ; हे आहे कारण

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 08, 2023 18:11 PM
views 278  views

वैभववाडी : मतदारयादीतून नाव कमी झाल्याने हेत गावच्या सरपंच कांचन कांबळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर ता.१५ आॉगस्ट उपोषणाला बसणार आहेत. मतदारयादीतील नाव जाणूनबुजून कमी केले आहे असा आरोप श्रीमती कांबळे यांनी केला आहे.

 श्रीमती कांबळे ह्या हेत गावच्या लोकानियुक्त सरपंच म्हणून सन २०२२ मध्ये निवडून आल्या आहेत.गावातील वार्ड क्रमांक २मधील मतदारयादीत त्यांचं नाव होतं. सध्या याच वार्डातील सदस्य पदासाठी पोट निवडणूक लागली आहे.परंतू या निवडणुकीत नव्याने आलेल्या मतदारयादीत त्यांचं नाव नाही.हे नाव जाणूनबुजून कमी केले असल्याचा श्रीमती कांबळे यांचा आरोप आहे.तसेच यापुर्वीही वार्ड २ मधील ३३ नावे कमी करण्यात झाली होती.या संदर्भात तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती.हे श्रीमती कांबळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले.याप्रकरणी उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.