
दोडामार्ग : तहसील कार्यालयाच्यावतीने आयोजित प्रशासकीय प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण समारंभ प्रसंगी दोडामार्ग तालुक्यातील वीर पत्नींचा महसूल प्रशासनाच्यावतीने विशेष सन्मान करत शहीद जवानांनी देशासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानापोटी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
शहीद जवान जगन्नाथ देसाई यांची वीरपत्नी वैजंती देसाई, शहीद जवान सोमा परब यांच्या विरपत्नी स्मिता परब यांना या प्रजासत्ताक दिनी तहसीलदार संकेत यमगर यांनी निमंत्रित केले होते. प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम झालेनंतर हा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक अरुण पवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.