महावारसा समितीवर सिंधुदुर्गातील 4 जणांची नियुक्ती !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: July 12, 2024 07:58 AM
views 287  views

सिंधुदुर्ग : किल्ले, राजवाडे, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन हत्यार, लेणी, गुहा, प्राचीन नाणी हा ऐतिहासिक ठेवा असुन या ऐतिहासिक वास्तू जतन , संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पुरातत्त्व संशोधन महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्या काळाच्या साक्षीदार असलेल्या या वास्तू आपल्यासमोर तो ऐतिहासिक काळ उलगडून दाखवतात. भारत देशाला व महाराष्ट्राला गड-किल्ल्यांची अनमोल ठेवा आहे. सिंधुदुर्ग जिल्हात जवळपास ३२ किल्ले असुन कित्येक गावात प्राचीन मंदिरे व ऐतिहासिक ठेवे आहेत. या ऐतिहासिक वास्तूंच्या जतन संवर्धन, संरक्षण बाबतीत सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सामिल करून समाजात या वास्तू व साधनांचे महत्त्व पटवून देऊन समाज प्रबोधन करणे आवश्यक आहे. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पुरातन वास्तू संरक्षण व संवर्धन करण्यासाठी युवकांची फळी उभारण्यासाठी आपणं प्रयत्नशील राहणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले वाचवण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी प्रतिनिधी समोर व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग मंत्रालय शासन निर्णय अंतर्गत राज्य संरक्षित स्मारक जतन व संवर्धन महावारसा समिती, सिंधुदुर्ग वर सदस्य म्हणून नुकतीच डॉ.संजीव लिंगवत यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी जाहीर केला.  डॉ. लिंगवत यांच्या सह डॉ.कमलेश चव्हाण, प्रा. एस्.एन्. पाटील, प्रा. दिलिप बडेकर यांना सदस्य  म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे.      

डॉ.संजीव लक्ष्मण लिंगवत हे  जनसेवा  प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले संवर्धन व संरक्षणासाठी गेली पंधरा ते वीस वर्षे सातत्याने जनजागृती करत आहेत.  वेंगुर्ले तालुक्यातील यशवंत गड, वेंगुर्ले कोट उर्फ डच वखार, निवती किल्ला स्वच्छता मोहिमे सह  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच किल्ल्यांवर त्यानी स्वच्छता मोहीमा राबविल्या आहेत. रेडी येथील यशवंत गड किल्ल्यांवरील खाजगी मालमत्ता बोर्ड तसेच अवैध बांधकाम रोखण्यासाठी व हटविण्यात यशवंत गड शिवप्रेमीं सोबत भुमिका  बजावली असू भारत देशातील साधारण दोनशे किल्ल्यांना भेटी देऊन  पाहणी केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले वाचवण्यासाठी पुरातत्व विभागाचे लक्ष वेधण्यासाठी व जिल्हाधिकारी तसेच स्थानिक शिवप्रेमी यांचे लक्ष वेधण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले  आहेत. राष्ट्रिय चॅनल ND natinal वर किल्ले बाबतीत थोडक्यात मुलाखत त्याची प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्र राज्यातील इतिहास लेखन विश्वास पाटील सारख्या लेखकाना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले दाखवून लिखाणासाठी सहकार्य केले  असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले व त्यांचे स्वराज्यासाठी योगदान आदी विषयांवर अनेक लेख प्रसिद्ध झाले  आहेत. किल्ले पर्यटन वाढविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहुन पद्मश्री परशुराम गंगावणे आदी महनीय व्यक्ती तसेच गोवा विद्यापीठ येथील डॉक्टरेक करणारे विद्यार्थी यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले दाखविण्यासाठी पुढाकार घेतला  आहे. प्रकाश नारकर, पत्रकार विजय शेट्टी, पत्रकार के. जी गावडे यांच्या सोबत Discovery of sindhudurg या संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरातन वास्तू, मंदिर, वीरगळ शोधण्यासाठी प्रयत्नशील केले  आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तरूण शिवप्रेमी यांना एकत्र करून किल्ले संरक्षण व संवर्धन , सिंधुदुर्ग घ्या माध्यमातून सर्व किल्ले स्वच्छता मोहीमा राबविण्यात प्रयत्न केला असुन किल्ले व पुरातन वास्तू पर्यटन या विषयावर अनेक व्याख्याने दिली  आहेत. ते सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण समितीचा उपाध्यक्ष असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेगवेगळ्या किल्ले गिर्यारोहण साठी कार्यरत आहेत . कोकण इतिहास परिषदेचा सक्रिय कार्यकर्ते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ले , किल्ले पर्यटन या विषयावर व्याख्यान दिली असून वेंगुर्ले येथील वेंगुर्ले कोट उर्फ डच वखार यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर लेख प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील तसेच जागतिक दर्जाच्या सिध्दार्थ वर्धराजन यांच्या The wire या वेबसाईटवर वेंगुर्ले कोट उर्फ डच वखार वर पाच हजार शब्दांत लेख प्रसिद्ध करण्यासाठी रुबेन मालेकर या पत्रकाराला मार्गदर्शन व सहकार्य केले  आहे. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुरातन वास्तू वर डॉक्टरेट करणारऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले  असून गोवा विद्यापीठाचे प्राध्यापक व डॉक्टरेट करणारे विद्यार्थी यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यावर मार्गदर्शन कार्यशाळा घेतली आहे. जिल्हा न्यायालय, जिल्हा विधी प्राधिकरण आपत्कालीन समितीचे ते सदस्य असुन संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून त्यांची नियुक्ती महावारसा समिती वर करण्यात आलेली आहे. डॉ.कमलेश तातु चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण समितीचे अध्यक्ष असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील धाडसी गिर्यारोहक म्हणून ते परिचित आहेत ते सिंधुदुर्ग ऍडव्हेंचर अँड टुरिझम डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष  असुन त्यांनी जागतिक पर्यटन वर्ष २०११ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांची माहीती जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना व्हावी म्हणुन संपुर्ण जिल्ह्यात ५०० सचित्र माहीतीफलक लावले होते.  त्यांनी वर्ष २०१२ जागतिक पर्यटन दिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण ते विजयदुर्ग अशी १६० कि. मी. २०० मोटरसायकल स्वारांची पर्यटन चेतना रॉली यशस्वी केली होती.

     मालवण तालुक्यातील वालावल हुमरमाळा गाव अ‍ॅडव्हेंचर व्हिलेज म्हणुन विकासित होण्यासाठी विषेश उपक्रम आणि साहस प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली असून कावळेसाद पॉईंट, आंबोली (ता. सावंतवाडी येथील बचाव कार्यात वेळोवेळी सहकार्य केले आहे.त्यांनी  व अभिजित चव्हाण या  दोघांनी कावळेसाद दरीत दोरी आणि माउंटेनरिंग उपकरणांच्या सहाय्याने २००० फुट खोल उतरून १६ कि. मी. चालत दरीत पडलेल्या रोहीत भिसेंचे पार्थिव पोलीसांच्या ताब्यात दिले.  कोणत्याही गिर्यारोहकाकडून कावळेसाद दरी यशस्वीपणे उतरुन गेल्याचा हा पहिलाच प्रयत्न त्यांनी यशस्वीपणे पार पाडला.

     त्यांची  सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ  आणि यु. एन्. डी. पी. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव २०१५ मध्ये सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव २०१५ चे "महोत्सव  अ‍ॅडव्हायझर" म्हणुन निवड करण्यात आली होती.सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव २०१५ मध्ये जिल्हा प्रशासन आयोजित १०० निवडक पर्यटकांच्या २ दिवसीय पर्यटक सहल आयोजनाची जबाबदारी सिंधुदुर्ग अॅडव्हेंचर टीमने उत्तम प्रकारे पार पाडल्याने सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ आणि  व यु. एन्. डी. पी. यांजकडून प्रशस्तिपत्रक आणि गौरवचिन्ह प्राप्त झाले होते. त्यांचे सन २०१२ पासुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री देवी भराडी यात्रा, आंगणेवाडी आणि श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा, कुणकेश्वर या दोन्ही यात्रांमध्ये निरंतर आपत्तकालीन व्यवस्थापण आणि गर्दीचे नियोजन यशस्वीपणे दरवर्षी अविरत सुरू आहे.

     ते "याशदा युनिव्हर्सिटी, पुणे 'द्वारा निर्मित महाराष्ट्र आपत्ती निवरन महासंघ,चे सिंधुदुर्ग सदस्य असुन Yashada University, Pune यांच्या मार्गदर्शनाखाली सुचालित 'महाराष्ट्र आपत्ती निवारण संघा'चे सिंधुदुर्ग प्रतिनिधी म्हणुन सिंधुदुर्ग अ‍ॅडव्हेंचरच्या २५ कार्यकर्त्यांना कुंभमेळा २०१५ मध्ये श्री क्षेत्र शिर्डी येथे काम पहाण्याची संधी तसेच संस्थेचे अध्यक्ष डॉ. कमलेश चव्हाण यांना शिर्डी देवस्थानच्या मंदीरातील गाभाऱ्यातील 'सिक्युरिटी शीपचे नोडल ऑफिसर' म्हणुन काम पहाण्याचा बहुमान मिळवला आहे. सिंधुदुर्ग अ‍ॅडव्हेंचर, बाबला अल्मेडा टीम आणि टीम आंबोली रेस्क्यू या जिल्ह्यातील तीन मोठ्या आणि well trained आणि well equipt टीम एकत्र येउन जिल्ह्यातील रेस्क्यू प्रंसंगी गेली १२ वर्षे एकत्रीत काम सुरु केले. दरीत कोसळलेले, पाण्यात बूडाले वा इतर कारणे मृत आढळल्यास आपत्कालीन विभागाच्या निर्देशांप्रमाणे रेस्क्यू पार पाडून पार्थिव पुढील कार्यवाहीसाठी शासकिय यंत्रणेच्या ताब्यात देणे.इत्यादि काम केली आज पर्यंत जुलै २०२४ पर्यंत सुमारे ३५ ऑपरेशनमध्ये संस्थेने सक्रिय सहभाग नोंदवला आहे. महाड येथील सावित्री नदीवरील दुर्घटनेतील आपत्तीत मदत कार्यासाठी व चिपळूण येथे वशिष्ठ नदीच्या पूरप्रसंगी मदत कार्यात सहभाग दर्शविला आहे. जिल्ह्यातील सुमारे ६५ गावांमध्ये स्वयंप्रेरणेने कार्यरत असलेल्या सर्पमित्र, प्राणिमित्रांचे सुचालित संघटन त्यांनी केले आहे. 

  त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपत्ती निवारण, प्रथमोपचार, सर्प विषयक मार्गदर्शन, पर्यटन रोजगार मार्गदर्शन शालेय शिबिरे आयोजन आहेत ते अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ पुणे निर्मित महाराष्ट्र माउंटन रेस्क्यू समन्वय समिती, सदस्य असून पर्यटन व्यवसाय महासंघ, कोकणचे सदस्य आहेत. सिंधुदुर्ग ऍडव्हेंचर दलाचे ते मार्गदर्शक असुन तरुण युवकांसाठी साहस धाडस निर्माण करण्यासाठी मोहीमा राबविण्याचे ते कार्य करतात.महाराष्ट्र राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी आपल्या टिमच्या सहकार्याने अनेक धाडसी मोहीमा राबविल्या असुन गिर्यारोहण व साहसी खेळा संबंधित कार्य करणाऱ्या संस्था प्रतिनिधी म्हणून त्यांची महावारसा समिती वर नियुक्ती करण्यात आली आहे. प्राध्यापक एस्.एन. पाटील हे १९९२ पासून वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात इतिहास विषयाचे सहाय्यक प्राध्यापक व  विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. जिल्ह्यासह महाराष्ट्रातील काही गड- किल्यांवर अभ्यास सहली आयोजित करीत असतात.

 तसेच सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण संघटना व कोकण इतिहास परिषद सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या माध्यमातून गड-किल्ले यांचे संवर्धन व स्वच्छता अभियानात सहभागी झाले आहेत. महावारसा समिती वर त्यांची इतिहास विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती देण्यात आली असून कोकण इतिहास परिषदेच्या माध्यमातून त्यांनी सक्रिय कार्य केले आहे. त्यांचे ऐतिहासिक प्रबंध प्रकाशित झाले असून इतिहास या विषयात भरीव कामगिरी करत आहेत ते सिंधुदुर्ग जिल्हा गिर्यारोहण समितीचे सचिव आहेत. प्राध्यापक दिपक बढेकर हे शासकीय तंत्रनिकेतन, मालवण येथे प्राध्यापक असुन सामाजिक कार्यात त्यांचे कार्य अनमोल आहे. स्थापत्य विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांची महावारसा समिती पदि नियुक्ती करण्यात आलेली आहे.