
दोडामार्ग : बांदा येथे झालेल्या अपघातात मृत्यूशी झुंज देत असलेल्या कळणे सरपंच अजित देसाई यांच्या आई हेमलता मनोहर देसाई (७२ ) हिचे आज अखेर सकाळी निधन झाले. कळणे गावचे सरपंच अजित देसाई यांच्या आईचा बांदा येथे अपघात झाला होता. अज्ञात दुचाकी स्वराने तिला ठोकर देऊन पलायन केले होते. त्यानंतर तिच्यावर गोवा येथे उपचार सुरु होते. तिला डोक्याला मोठी दुःखापत झाली असल्याने ती कोमात गेली होती. त्यानंतर तिच्या डोक्याला मार लागन्याने तिच्या डोक्यावर गंभीर परिणाम झाले होते. व तिला मेंटली प्रॉब्लम झाला होता. या संदर्भात अजित देसाई यांनी बांदा पोलिसात तक्रार दिली होती. मात्र, बांदा पोलीसानी या अपघात तक्रारीवर दुर्लक्ष केल्याचा आरोप सरपंच अजित देसाई यांनी केला होता.
बांदा वाफोली मार्गावर 12 जुलै रोजी सायंकाळी पायी चालत जातं असताना हेमलता देसाई हिला अज्ञात दुचाकी स्वाराने मागून धडक दिली. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तिला गोवा येथे खाजगी रुग्णालयात उवचारासाठी दाखल केली. तिच्यावर दोन शस्त्र क्रिया करून त्या 20 हुन अधिक दिवस बेशुद्ध होत्या एवढा गंभीर अपघात घडून बांदा पोलिसांनी याची दखल घेतली नाही. पळून गेलेला दुचाकिस्वार गोव्याच्या दिशेने पळून गेला. त्या बाबत सीसी टीव्ही फुटेज पोलिसांकडे असून देखील पोलिसांनी त्याचा शोध घेतला नाही. वारंवार विचारणा केली असता त्याचा तपास सुरु आहे असच पोलिसांकडून सांगण्यात यायचं. गेल्या महिनाभर या अपघाताचा तपास पोलिसांनी केलाच नाही असं सरपंच अजित देसाई यांनी सांगितलं.
निधन पावलेल्या महिला ह्या गोवा स्वतंत्र्य लढ्यातील सैनिक व २५ वर्षे सरपंच राहिलेल्या फक्रोजीराव देसाई यांची सून माजी सैनिक व माजी सरपंच मनोहर देसाई यांची पत्नी आहेत. त्यांचा एक मुलगा निमलष्करी दलात आहे तर दुसरा मुलगा कळणेचे विद्यमान सरपंच आहेत. त्यांची कौटुंबिक अशी पाश्वभूमी बसताना पोलिस प्रशानाकडून त्याच्या तक्रारीकडे दखल घेतली जातं नाही. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी कुटुंबासह ओरोस येथे उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिला होता. मात्र, उपोषणा आधीच त्यांचा आईने आज सकाळी आपला प्राण सोडला. पण त्यांचा मृत्यू नंतर त्यांना न्याय मिळणार काय? हे पाहणे गरजेचं आहे.