
वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदाचा कार्यभार हेमंत मारुती किरुळकर यांनी गुरुवारी स्वीकारला आहे. ते पुणे महानगरपालिका येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. दरम्यान, वेंगुर्ले नगरपालिकेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची नुकतीच नागपूर महानगरपालिका येथे सहाय्यक आयुक्त म्हणून पदोन्नतीने बदली म्हणून झाली आहे. त्यांनी आपल्या. कालखंडात वेंगुर्ले शहरात चांगले विकासात्मक काम केले. त्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुक झाले.