
देवगड : युथ फोरम देवगड, देवगड-जामसंडे शहर कमिटी आणि देवगड महाविद्यालय कमिटी अंतर्गत विद्यार्थी हेल्पलाईनचे अनावरण केले.युथ फोरम देवगडच्या ५व्या वर्धापन दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात महाविद्यालय कमिटीची स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी युथ फोरम देवगडचे अध्यक्ष ॲड. सिद्धेश माणगांवकर यांनी विद्यार्थी हेल्पलाईन नंबर बबात घोषणा केली होती. त्याप्रमाणे आज युथ फोरमने विद्यार्थानंसाठी हेल्पलाईन नंबरचे अनावरण केले.स. ह. केळकर महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारा समोर देवगड-जामसंडे नगरपंचायतचे नगरसेवक संतोष तरी यांच्या हस्ते विद्यार्थी हेल्पलाईन नंबरच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी युथ फोरम देवगड अध्यक्ष ॲड.सिद्धेश माणगावकर, खजिनदार सागर गावकर, शहर कमिटी अध्यक्ष ओंकार सारंग,उपाध्यक्ष जितेश मोहिते, सह.सचिव दीप नलावडे, शुभम महाजन, कार्यकारणी सदस्य राधा जगताप, श्रवण बांदेकर ,रुद्रा शेट्टे , श्रेयस कडू, हर्षित कोयंडे ,शहर कमिटी माजी अध्यक्ष सोहम पारकर, कॉलेज कमिटी अध्यक्ष दीपक जानकर, कॉलेज कमिटी उपाध्यक्ष पूर्वा चौघुले , देवांत गावकर, सचिव सलोनी कदम, सह .सचिव स्नेहा भस्मे , तनिष नाईक , वेदिका धुवली, पार्थ नाईकधुरे, आचाल वर्मा, स्वराज आचरेकर, भूपेश हरम , महेश्वरी कोयंडे , वैभवी घरकर , पियूष केतकर , ओम गांवकर तसेच यूथ फोरम देवगडचे सभासद आणि विद्यार्थी उपस्थित होते.