देसाई कुटुंबियांना केसरकरांच्या माध्यमातून मदत !

Edited by: लवू परब
Published on: July 02, 2024 08:03 AM
views 129  views

दोडामार्ग : तालुक्यातील हेवाळे गावात दोन वर्षांपूर्वी अश्विनी आपासाहेब देसाई आणि अन्नपूर्णा आपासाहेब देसाई या दोघांचे पती तिलारी नदीत बुडून त्यांचं निधन झालं होतं. त्या दोघांच्या पत्नी यांना आज मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात आली.

हेवाळे येथील तिलारी नदीपात्रात दोन वर्षापूर्वी दोन युवक आपासाहेब आत्माराम देसाई आणि आपासाहेब दत्ताराम देसाई यांचा तिलारी नदीत बुडून मृत्यू झाला होता. त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारकची शासकीय मदत मिळाली नव्हती. ही बाब येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्या कानावर घातली होती. त्यावेळी केसरकर यांनी त्या दोघांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्याचे केसरकर यांनी आश्वासन दिले होते. त्याचं पार्श्वभूमीवर आज मंगळावर दीपक केसरकर यांच्या मानधनातून अश्विनी आपसाहेब देसाई व अन्नपूर्णा आपासाहेब देसाई या दोघांना दोडामार्ग शिवसेना कार्यलय येथे बोलावून धनादेश देण्यात आले. 

यावेळी शिवसेना दोडामार्ग तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, शैलेश दळवी, राजू निंबाळकर, दादा देसाई, भगवान गवस, मायकल लोबो, रामदास मेस्त्री, गुरुदास सावंत, दादा पालयेकर, सचिन देसाई, हेवाळे सरपंच साक्षी, उपसरपंच समीर देसाई, गोपाळ गवस आदी उपस्थित होते.