गणेशोत्सवात कुडाळातील 'या' भागात अवजड वाहनांना बंदी

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 06, 2023 19:47 PM
views 414  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत मासिक सभेसमोर चर्चा व विचार विनिमय मध्ये झालेल्या निर्णयानुसार करून गणेशोत्सव काळात १४ ते ३० सप्टेंबर या कालावधीत नगरपंचयतीच्या मालकीचा रस्ता असलेल्या हॉटेल अभिमन्यू ते काळप नाका एस. टी. डेपो रस्ता हा पुर्णपणे मोकळा राहणार आहे. सकाळी ८.०० ते रात्री ९.०० या वेळेत अवजड वाहनांना व चार चाकी वाहनांना मुख्य बाजारपेठेमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे. कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.


अनंत मुक्ताई हॉटेल समोरील मोकळ्या जागेमध्ये तसेच कोर्टाकडील मोकळया जागेमध्ये चार चाकी वाहनांना पार्किंग व्यवस्था निश्चित करुन देण्यात येईल तसेच नार्वेकर बेकरी ते भाट बिल्डींग तसेच नगरपंचायत मालकीचे पटांगण व भाजीमार्केट या ठिकाणी व्यापा-यांना व्यापार करणेस परवानगी देण्यात आली आहे.असे ही नगरपंचायतने प्रसिद्ध असलेल्या पत्रकात म्हटले आहे.


 १४ ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये पोलीस खात्यातील कर्मचारी हे सतत कार्यरत राहतील अश्या आशयाचे पत्र पोलीस खात्याला देण्यात आले आहे. आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक तसेच सुचना फलक लावणेत आले असल्याचे ही कुडाळ नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांच्या  वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.