
देवगड : देवगड जामसंडे येथे मुसळधार पावसाने झोडपले असून जामसंडे टिळकनगर येथे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळून खाक झाली आहेत. गुरुवारी सकाळी दहा वाजता वाऱ्यासह ढगांच्या गडगडात सुरू होऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या मुसळधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली होती. याचाच फटका जामसंडे टिळक नगर येथील मंदाकिनी मोहन मयेकर यांच्या घरातील विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान झाले आहे. सदरची घटना सकाळी 10:25 वाजण्याच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेविका तन्वी चांदोस्कर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर जामसंडे तलाठी तसेच पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मात्र गुरुवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र गारवा झाल्याने नागरिकांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.उन्हा मुळे नागरिक हैराण झाले होते. उन्हाळ्यात गर्मीमुळे नागरिकांचे बेहाल झाले होते. जनावरांना उन्हाची जळ पोहचत होती.त्यामुळे देवगड जामसंडे हे शहर कातळी भागावर वसले असल्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मात्र या मुसळधार झालेल्या पावसामुळे नागरिकांना काहीअंशी का असेना पाण्याचा प्रश्न सुटेल.