हृदयविकाराच्या झटक्याने 38 वर्षाच्या तरुणाचं निधन !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 04, 2024 16:55 PM
views 4081  views

सावंतवाडी : कोलगाव भोमवाडी येथील कुलदीप अरुण राऊळ (३८) या युवकाचे गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्याच्या आकस्मित निधनान राऊळ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच कोलगाव गावावर शोककळा पसरली. दुपारी शोकाकुल वातावरण त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुलदीप राऊळ यांना सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्याचे निधन झाले. सावंतवाडी येथील नित्या आईस्क्रीम एजन्सीमध्ये तो सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून कार्यरत होता. तत्पूर्वी सावंतवाडीत गवळी तिठा येथील अहिल्या मेडिकलमध्येही त्याने काम केले होते. गावातील सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमातही त्याचा सक्रिय सहभाग असायचा. शांत, मनमिळावू व कष्टाळू स्वभावाच्या कुलदीपच्या अकाली निधनाचा कोलगाववासियांसह त्याच्या मित्र परिवाराला धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे. कोलगाव सरपंच संतोष राऊळ तसेच संदेश राऊळ यांचे ते सख्खे भाऊ होत.