आरोग्याची परिस्थिती महिनाभरात बदलेलं : राजन तेली

Edited by:
Published on: December 14, 2023 18:23 PM
views 135  views

सावंतवाडी : सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला येथील रूग्णालयात गोवा मेडिकल कॉलेजचे डॉक्टर द्यावेत अशी मागणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तर जिल्ह्याचा आरोग्य परिस्थितीची गंभीर दखल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतली आहे. महिना अखेरपर्यंत ही परिस्थिती बदलेली असेल अस मत राजन तेली यांनी व्यक्त केल.

डॉक्टरांची कमतरता ही वस्तुस्थिती आहे. डॉक्टरांची वानवा ही स्थिती आजचीच नाही, वरचेवर अशी परिस्थिती असते. त्यामुळे कोल्हापूर मेडिकल कॉलेजचे लोक कणकवली, देवगड परिसरात येतात. त्याप्रमाणे सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला येथील रूग्णालयात गोवा मेडिकल कॉलेजचे डॉक्टर याठिकाणी द्यावे अशी मागणी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी व शल्य चिकित्सक जेवढी मागणी करतात तेवढा औषध पुरवठा रूग्णालयांना केला जातो आहे. उलट पालकमंत्री यांनी टेक्निकल स्टाफसह औषधाला अधिकचे लागणारे पैसै देखील देईन अस सांगितल आहे. जिल्हा नियोजनमधून औषधांसाठी जेवढा पैसा लागेल तो पुरवला जाईल अस त्यांनी सांगितले आहे. मात्र, डीन आणि शल्य चिकित्सक यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी यांना समोर घेऊन तशा सुचना दिल्या आहेत. या परिस्थितीची गंभीर दखल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतली आहे. महिना अखेरपर्यंत ही परिस्थिती बदलेली असेल अस मत राजन तेली यांनी दिली. पालकमंत्री यांनी औषधांच्या बाबतीत तक्रार येता नये अशा सक्त सुचना केल्या आहेत. 

आंबोली-सावंतवाडी रस्ता दुरावस्थेस जबाबदार ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येत आहे. रस्त्याच्या दुरूस्तीच कामही सुरू आहे. घोटगे सोनवडे घाटरस्ता होण्यासह चौफेर विकासाच्या दृष्टीने पालकमंत्री कार्यरत आहेत. यात काही ठेकेदार अशी मस्ती करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. 

भाजप व शिवसेना हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत. आमच्या पार्टीचा नारा हा शतप्रतिशत भाजपचा आहे. उमेदवार वगैरे हा नंतरचा विषय आहे. त्यात ग्रामपंचायतीत आमच्या पक्षाला मिळणार यश पहाता तिन्ही मतदारसंघात भाजपचा उमेदवार असावा व कमळ निशाणीवर तो लढावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. लोकसभेसाठी देखील तीच इच्छा असल्याच माजी आमदार राजन तेली म्हणाले. यावेळी माजी नगरसेवक आनंद नेवगी, माजी सभापती पंकज पेडणेकर, दादा परब आदी उपस्थित होते.