सातार्डा ग्रा.पं. माध्यमातून उपआरोग्य केंद्राला आरोग्य किट

Edited by: विनायक गांवस
Published on: September 17, 2025 16:49 PM
views 132  views

सावंतवाडी : तालुक्यातील सातार्डा ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून मिळालेल्या निधीचा योग्य वापर करत गावातील उपआरोग्य केंद्राला विविध अत्यावश्यक औषधे आणि आरोग्य किटचे वाटप केले आहे. गावातील आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीने हा महत्त्वाचा पुढाकार घेतला आहे.


या औषधांचे वाटप सरपंच संदीप उर्फ बाळू प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले. उपआरोग्य केंद्राचे डॉ. एमगेकर आणि आरोग्य सेविका दिपाली परब यांनी ही औषधे आणि आरोग्य किट स्वीकारले. यावेळी ग्रामपंचायतीचे अनेक सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते, ज्यात ग्रामसेवक कुणाल मस्के, माजी सरपंच उदय पारिपत्ते, ग्रामपंचायत सदस्य उत्कर्ष पेडणेकर, शर्मिला मांजरेकर, वासुदेव राऊळ, विनिता गोवेकर यांचा समावेश होता. त्यांच्यासोबतच सगुण गोवेकर, संतोष गोवेकर, संजय पवार, सोनू पवार, संतोष पवार, योगेश गोवेकर, अशोक जाधव आदी ग्रामस्थही या कार्यक्रमाला उपस्थित होते. या पुढाकारामुळे गावातील आरोग्य सेवा अधिक सुलभ आणि प्रभावी होईल, असा विश्वास सरपंच संदीप प्रभू यांनी व्यक्त केला. ग्रामपंचायतीच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.