पत्रकार संघ आणि माधवबागतर्फे आरोग्य तपासणी शिबीर..!

Edited by: भगवान शेलटे
Published on: October 22, 2023 15:53 PM
views 89  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात पत्रकारांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धडधडीत राहण्यासाठी आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या सामाजिक संघटनांनी कायम पुढाकार घेणे गरजेचे आहे असे मत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांनी मांडले. शहराबरोबर ग्रामीण भागात अशा प्रकारे आरोग्य तपासणी सारखे उपक्रम राबविण्यात यावेत. या उपक्रमात एखाद्या जरी गरजू रुग्णांना फायदा झाला तर त्या उपक्रमाचे सार्थक झाल्यासारखे आहे, असे त्यांनी सांगितले.

सिंधुदूर्ग जिल्हा पत्रकार संघ, डिजीटल मीडिया सेल सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने माधवबाग परिवाराच्यावतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबीरात ते बोलत होते. यावेळी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश्चंद्र पवार, सिंधुदुर्ग डिजीटल मीडियाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, माधवबाग परिवाराचे डॉ. माधवी सांगावकर, डॉ. अमेय पाटकर, शिल्पा गावकर, प्रियांका पाटणकर, पत्रकार संघाचे माजी तालुकाध्यक्ष प्रविण मांजरेकर, विजय देसाई, सचिव मयुर चराठकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर, उमेश सावंत, प्रसाद माधव, अभिमन्यू लोंढे, भुवन नाईक, नितेश देसाई आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. ऐवाळे म्हणाले, या ठिकाणी पत्रकारांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आरोग्य तपासणीचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. जिल्ह्याच्या जडणघडणीत पत्रकारांचा फार मोठा वाटा आहे. त्यांचे आरोग्य सृदृढ रहावे यासाठी माधवबागने घेतलेला पुढाकार फार मोठा आहे. भविष्यात सुध्दा अशा प्रकारचे उपक्रम राबविणे गरजेचे असून शहराबरोबर ग्रामीण भागात असलेल्या रुग्णांना त्याचा फायदा मिळवून द्यावा, अशा उपक्रमातून एखाद्या जरी गरजू रुग्णाचा आपण जीव वाचवू शकलो तर त्याचा आनंद हा फार मोठा आहे. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खजिनदार रामचंद्र कुडाळकर तर आभार सचिव मयुर चराठकर यांनी मानले.