
वैभववाडी : आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि बी के एल वालावलकर रुग्णालय डेरवणे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार २५ डिसेंबर रोजी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेले आहे. सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत विविध आजारांची तपासणी केली जाणार आहे.
या शिबिरामध्ये हर्निया, अल्सर ,अपेंडिक्स, थायरॉईड, मुळव्याध, मुतखडे, प्रोस्टेट ग्रंथी, टॉन्सिल्स, चरबीच्या गाठी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, पित्ताशयातील खडे, कान, नाक, घसा ,शस्त्रक्रिया, कानाच्या पडद्याच्या शस्त्रक्रिया ,महिलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया ,इम्प्लांट रिमूव्हर यांच्या मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत . याकरिता रुग्णांनी आपले रिपोर्ट व चालू औषधे आणणे आवश्यक आहे. तसेच सदर शिबिरामध्ये शस्त्रक्रिया करण्यायोग्य रुग्ण आढळल्यास केशरी व पिवळा रेशन कार्ड धारकांसाठी मोफत शस्त्रक्रियाही केली जाणार आहे.
या शिबिरात रुग्णांनी आपली नोंदणी २४ डिसेंबर करावयाची आहे. याकरिता प्रवीण पेडणेकर ,राजेंद्र राणे, सिद्धेश रावराणे, अनंत फोंडके, सुधीर नकाशे, संजय रावराणे, नेहा मानकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे स्थानिक समिती सचिव प्रमोद रावराणे यांनी केले आहे.