सावंतवाडी पत्रकार संघाच्यावतीने आरोग्य तपासणी शिबीर

Edited by: विनायक गांवस
Published on: December 07, 2024 19:36 PM
views 153  views

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने सोमवारी ९ डिसेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे. हे शिबिर सकाळी साडेआठ वाजता येथील उपजिल्हा रुग्णालयात पार पडणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराटकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी केले आहे.

 

या आरोग्य शिबिराचे उद्घाटन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे असणार आहेत. तर मराठी पत्रकार परिषदेचे माजी राज्य अध्यक्ष गजानन नाईक, ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकर, अँड. संतोष सावंत, प्रवीण मांजरेकर, नवयुग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उदय भोसले, वैद्यकीय अधिक्षक डॉ. गिरीश चौगुले, स्त्रीरोग तज्ञ डॉ. ज्ञानेश्वर शेवाळे आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.