
सावंतवाडी : मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे तालुक्यातील पत्रकारांसाठी शनिवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वा उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व पत्रकार मित्रांनी शिबिराला उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन अध्यक्ष प्रवीण मांजरेकर. सचिव प्रसन्न राणे, खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांनी केले आहे.