
देवगड : देवगड तालुक्यातील शिरगाव टेलीमेडिसीन सेंटर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
आज दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिरगाव टेलीमेडिसीन सेंटर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. अशा प्रकारच्या टेलीमेडिसीन सेंटर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 20 सेंटर आहे. त्यामध्ये शिरगाव मधील हे सेंटर गरजू लोकांना वरदान ठरत आहे. या शुभप्रसंगी भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम बोलत होते.
यावेळी शिरगाव उपसरपंच संतोष फाटक, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित ढवळे, राजू शेट्ये, मंगेश लोके, सुभाष नार्वेकर, शैलेंद्र जाधव, शिरगाव पोलीस पाटील चंद्रशेखर साटम, सदानंद चव्हाण, महेश जाधव, संतोष जंगले, शरद फाटक, प्रथमेश लाड इत्यादी मान्यवर तसेच आरोग्य तपासणीसाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले आणि चव्हाणयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.










