
चिपळूण : तालुक्यातील क्षेत्र टेरव येथील आद्यशक्ती कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई शक्तीपिठाचा चौदावा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक ८ में २०२५ रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाला. अभ्यंगस्नान, अभिषेक, नवचंडी याग, नवचंडी हवन, महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, दुपारी महाआरती, महाप्रसाद व संध्याकाळी महाआरती इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
वर्धापन दिनानिमित्त अखिल भारतीय जिल्हा बैलगाडी चालक मालक संघटनेच्या मान्यतेने जिल्हा स्तरीय (टेरव) कोकण केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन रविवार दिनांक ११ मे, २०२५ रोजी करण्यात आले होते. सदर स्पर्धेत गावठी बैलजोड्या ४०, आडघाटी बैलजोड्या २०, घाटी बैलजोड्या ९० अशा एकूण १५० बैलजोड्यांनी सहभाग घेतला होता. सदर दिनी बी. के. एल. वालावलकर हॉस्पिटलच्या संचालिका सौ. सुवर्णा पाटील मॅडम यांच्या सहयोगाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यात हॉस्पिटलच्या ५ डॉक्टर व १० नर्स व इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच टेरव गावचे सुपुत्र श्री बाबू भाऊराव कदम यांचेही सहकार्य या आरोग्य शिबिरास लाभले. बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी आलेल्या ४००० ते ५००० नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
सदर आरोग्य शिबिर व बैलगाडी शर्यत यशस्वी करण्यासाठी गावातील ग्रामस्थांचा तसेच अखिल रत्नागिरी जिल्हा बैलगाडी चालक मालक संघाचाही मोठा सहभाग होता. तसेच बाळभाऊ कदम, प्रदीप जगदीश कदम, गणेश कदम, बाबू दादबाराव कदम, नागेश कदम, संतोष म्हालिम, उमेश कदम, पार्थ कदम, अशोकराव कदम, अनंत चांदीवडे, प्रशांत फागे, एकनाथ माळी, बाळू घाग, रघुनाथ महागावकर, आत्माराम दाते, सुरज कदम, पोलिस पाटील सुहास मोहिते, सरपंच किशोर कदम, तलाठी मॅडम, नायब तहसीलदार चव्हाण साहेब, सर्कल जाधव साहेब,चिपळूण पोलिस ठाण्याचे जाधव, राठोड, पाटील साहेब यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
सदर स्पर्धा अत्यंत उत्साहात व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी काटेकोर नियोजन सुनील सुधाकरराव कदम (निम्मेगाव) यांनी केले. खालील विजेत्या बैलगाडी मालकांचा सन्मान व बक्षीस वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
गावठी अ गट अंतिम विजेते:
१. प्रथम क्रमांक : संकेत जाधव, कुंभार्ली (बैलांची नावे पिस्तूल, टिंग्या)
२. द्वितीय क्रमांक: विजय मोहिते, पेढांबे (बैलांची नावे शिट्टी, पांड्या)
३. तृतीय क्रमांक : राजू लाड, वैभव तानकर शिरवली (बैलांची नावे देवा, भैरव)
गावठी ब गट अंतिम विजेते:
१. प्रथम क्रमांक : महेश मांजरेकर, कोळकेवाडी, अजय करेलकर, लांजा (बैलांची नावे शंभू, बकासुर)
२. द्वितीय क्रमांक बाळुशेठ शिंदे कळकवणे (बैलांची नावे लाख्या, गोंड्या)
घाटी गट अंतिम विजेते:
१. प्रथम क्रमांक : मनोहर चाळके, चिंचघरी, समीर कदम आवाशी, अक्षय बाईत (बैलांची नावे गब्बर, महाराज)
२. द्वितीय क्रमांक : निशान साळवी कापसाळ, मुसासेठ चौघुले (बैलांची नावे पतंग, सरकार)
३. तृतीय क्रमांक : रुपेशसेठ. इंगवले, दळवटणे (बैलांची नावे दबंग, कन्नैया)
४. मुसासेठ चौघुले, निशांत साळवी, कापसाळ, (बैलांची नावे रुद्रा, रायफल)
५. रामदास चाळके, चिंचघरी, (बैलांची नावे पक्षा शंभू)