रश्मी मोरजकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनी नांदगाव आरोग्य केंद्राला मोफत वैद्यकीय साधने

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 02, 2025 14:08 PM
views 141  views

कणकवली : कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील  दिवंगत रश्मी राजेंद्र मोरजकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त आज नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला मोफत वैद्यकीय साधने वाटप करुन आगळ्यावेगळ्या पद्धतीने उपक्रम हाती घेतला. यात डिजिटल बीपी ऑपरेटर, ग्लुकोमीटर आणि स्ट्रीप, विटामिन के इंजेक्शन, भिंतीवरील मोठे घड्याळ, टेबलावरील फ्लावर पॉट आदी साहित्याचा समावेश आहे.

या  साहित्याची नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्यंत गरज असल्याने नांदगाव येथील व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या श्री राजेंद्र रामचंद्र मोरजकर यांच्या जवळ किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी संपर्क साधला असता राजेंद्र मोरजकर यांनी सर्व साहित्य पुरस्कृत केलेले आहे.

यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर बोलताना सांगितले की, रुग्ण कल्याण समिती बैठकीवेळी या आरोग्य केंद्र येथे वस्तूंची कमतरता असल्याचे लक्षात आले. दरम्यान रश्मी राजेंद्र मोरजकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त उपक्रम घेणार होते.या अनुषंगाने ऋषिकेश मोरजकर यांच्या शी चर्चा करून राजेंद्र मोरजकर यांच्या पुरस्कृत सदर वस्तू देण्यात आल्या.या ही पुढे  अशा वस्तू देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन यावेळी दिले. तर मोरजकर ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून उपक्रमाबाबत माहिती देत अशा काही छोट्या मोठ्या वस्तूंची कमतरता असल्यास यादी द्यावी. त्या ही वस्तू देण्यासाठी राजेंद्र मोरजकर यांच्या मार्फत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले.

साहित्य वितरण वेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर, ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, नांदगाव पोलीस पाटील सौ.वृषाली मोरजकर, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी डॉ देसाई, आरोग्य सहाय्यक श्री कांबळे, आरोग्य सहाय्यीका श्रीमती पवार , मारुती मोरये, तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. शेवटी आभार आरोग्य सहाय्यक श्री कांबळे यांनी मानले.सदर उपक्रमाबाबत सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.