
देवगड : सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर शीर नसलेला मृतदेह सापडल्याने खळबळ माजलीय. हा पुरुषाचा मृतदेह आहे. मात्र ओळख पटवण्यात अडचणी येतायत.
फणसे येथील समुद्रावर अज्ञात मृतदेह सापडला. या मृतदेहाच शीर गायब आहे. देवगड फणसे येथील समुद्र किनारी शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्थानिक नागरिकांना हा मृतदेह आढळून आला आहे.
हा मृतदेह पुरुषाचा असून त्याच्या अंगावर आकाशी रंगाचा टी-शर्ट आणि क्रीम रंगाची हाफ पँट आहे. मृतदेहाला शीर नसल्यामुळे त्याची ओळख पटत नाही. जवळपास मृत व्यक्तीचे वय 45 असण्याची शक्यता आहे.
हेड कॉन्स्टेबल आशिष कदम व भाऊ नाटेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून पंचनामा केला आहे. या या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.