त्यांनी गोव्यात जात केलं रक्तदान | वाचवले रूग्णाचे प्राण

Edited by: विनायक गावस
Published on: September 04, 2023 21:53 PM
views 103  views

सावंतवाडी : गोवा बांबोळी या रुग्णालयामध्ये ॲडमिट असलेल्या रामू पवार या रुग्णाला शस्त्रक्रिये दरम्यान A+ पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या रक्ताची तातडीने आवश्यक्यता होती. यावेळी सूदन केरकर, तुषार बागकर, अरुण शिरसाट यांनी गोवा मेडिकल कॉलेज रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. युवा रक्तदाता संघटनेचे सातार्डा येथील श्री सुदन केरकर यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. रक्तदान करत जीवनदान देण्याचा संदेश या युवकांनी दिला. याबद्दल युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी त्यांचे अभार मानले.