
देवगड : देवगड तालुक्यातील तुळशीकाटे येथे बागेतील माडाला पाणी घालत असताना चक्कर येऊन पडून शरद सहदेव कणेरकर (५१) हे चक्कर येऊन बेशुद्ध झाले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
मित्राच्या बागेतील माडाला पाणी घालत असताना देवगड मळई येथील शरद सहदेव कणेरकर (५१) हे चक्कर येऊन बेशुद्ध पडले. त्यांना तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. ही घटना गुरुवारी सकाळी ८ वा. वा. च्या सुमारास देवगड- तुळशीकाटे येथे घडली. घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
पोलिसांन कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे शरद कणेरकर हे तुळशीकाटे येथील त्यांचा मित्र निरंजन शेवरेकर यांच्या बागेत माडांना पाणी घालण्यासाठी गुरुवारी सकाळी गेले होते. तेथे त्यांना अचानक चक्कर आली व ते बेशुद्ध पडले. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
शरद कणेरकर यांच्या पश्चात भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. शरद कणेरकर हे घरांची बांधकामे करीत असत. ते उत्कृष्ट कारागीरही होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
या घटनेची फिर्याद त्यांचा पुतण्या योगेश राजेंद्र कणेरकर यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली.त्यानुसार देवगड पोलिसांनी घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली आहे.










