
सावंतवाडी : श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ,सावंतवाडी, नामदार दिपकभाई केसरकर मित्रमंडळ व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सलग सहव्या वर्षी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त "हे चांदणे फुलांनी..." जुन्या - नव्या हिंदी व मराठी गीतांचा व चित्रपट गीतांचा सदाबहार नजराणा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी २६ नोव्हेंबरला सायंकाळी ठीक ६ वा. जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान सावंतवाडी (गार्डन) येथे ही मैफिल रंगणार आहे.
हा कार्यक्रम सद्गुरु संगीत विद्यालयाच्या कु वर्षा देवण - धामापुरकर, ॲड सिद्धी परब, कु समृद्धी सावंत, कु मधुरा खानोलकर, कु केतकी सावंत,सौ अनामिका मेस्त्री, सौ पूजा दळवी, श्री नितिन धामापूरकर, कु भास्कर मेस्त्री, कु सर्वेश राऊळ, सौ मानसी वझे, कु अंकुश आजगांवकर, कु स्मिता गावडे, कु चिन्मयी मेस्त्री, कु श्रिया म्हालटकर, कु तन्वी दळवी, कु आरोशी परब कु आरोही परब, कु. विभव विचारे, कु .ऋतुजा परब, कु. मुग्धा पंतवालावलकर हे विद्यार्थी कार्यक्रम सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाला साथसंगत श्री निलेश मेस्त्री व (हार्मोनियम) , श्री किशोर सावंत व कु सिद्धेश सावंत, कु निरज मिलिंद भोसले (तबला), श्री अश्विन (गुड्डू) जाधव (ऑक्टोपॅड), कु. मंगेश मेस्त्री, कु. पुरुषोत्तम केळुसकर (सिंथेसायझर) व सूत्रसंचालन श्री संजय कात्रे तर ध्वनी संयोजन श्री हेमंत मेस्त्री - पडेलकर करणार आहेत. गुरूवर्य श्री निलेश मेस्त्री यांच्या निर्मिती व संकल्पनेतून हा कार्यक्रम सादर होणार आहे. रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ सावंतवाडी, नामदार दिपकभाई केसरकर मित्रमंडळ, सद्गुरु संगीत विद्यालय, पालकवर्ग व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या वतीने करण्यात आले आहे.