त्रिपुरारीच्या चांदण्यात रंगली मैफिल !

सलग ६ व्या वर्षी 'हे चांदणे फुलांनी...' !
Edited by: विनायक गावस
Published on: November 27, 2023 16:39 PM
views 166  views

सावंतवाडी : श्री सद्गुरु संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी, नामदार दिपकभाई केसरकर मित्रमंडळ व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सलग सहव्या वर्षी खास त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त "हे चांदणे फुलांनी..." जुन्या - नव्या हिंदी व मराठी गीतांचा व चित्रपट गीतांचा सदाबहार नजराणा या कार्यक्रमाचे आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आले. रविवारी २६ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेच्या रम्य सायंकाळी जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान सावंतवाडी येथे ही मैफिल संपन्न झाली. मोठ्या संख्येने रसिक श्रोते यावेळी उपस्थित होते. एकापेक्षा एक सुरेल गीतांच्या सादरीकरणानं सावंतवाडीकर मंत्रमुग्ध झाले.

              

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते श्रीपाद चोडणकर,  नंदू शिरोडकर, आबा केसरकर, दिनकर परब, दादा मडकईकर भाई देऊलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. गायिका सौ. वर्षा देवण - धामापुरकर, ॲड. सिद्धी परब, , कु केतकी सावंत,कु समृद्धी सावंत, कु मधुरा खानोलकर,सौ अनामिका मेस्त्री, सौ पूजा दळवी, श्री नितिन धामापूरकर, कु भास्कर मेस्त्री, कु सर्वेश राऊळ, सौ मानसी वझे, कु अंकुश आजगांवकर, कु स्मिता गावडे यांनी एकापेक्षा एक सरस गीते सादर करत रसिकांना खिळवून ठेवले. कु चिन्मयी मेस्त्री, कु श्रिया म्हालटकर, कु तन्वी दळवी, कु आरोशी परब, कु आरोही परब, कु. विभव विचारे, कु. ऋतुजा परब, कु. मुग्धा पंतवालावलकर या बालचमुच्या विशेष सादरीकरणाने सर्व रसिकांचे लक्ष वेधून घेतले. तर कु. मनिष पवार, कु. मंगेश मेस्त्री व कु पुरुषोत्तम केळुसकर या त्रिकूटाच्या हार्मोनियम वादनाने सर्वांची मने जिंकली. त्यामुळे या कार्यक्रमास अधिकच रंगत आली. 

            

या कार्यक्रमाला साथसंगत निलेश मेस्त्री (हार्मोनियम), किशोर सावंत व कु सिद्धेश सावंत, कु निरज मिलिंद भोसले (तबला), श्री अश्विन (गुड्डू) जाधव (ऑक्टोपॅड), कु. मंगेश मेस्त्री, कु. पुरुषोत्तम केळुसकर (सिंथेसायझर) यांनी केली. तर संजय कात्रे यांनी आपल्या विशेष व अभ्यासपूर्ण शैलीमध्ये निवेदनाची धुरा सांभाळली. ध्वनीव्यवस्था हेमंत मेस्त्री - पडेलकर यांनी सांभाळली. या मैफिलीस सौ. हेमलता मिरजकर, श्री मिरजकर ,सौ अनघा रमाणे, श्रीम.रजनी ख्ककर,सौ अर्चना वझे, सुधीर धुमे, श्रीम. मानसी भोसले, शुभांगी खानोलकर, लक्ष्मण आंबेरकर, सुवर्णा मुधाळे, संजय केरकर, बाळासाहेब पाटील, प्रसाद दळवी, सुभाष राऊळ, राजेश गुडेकर यांच्या सह अनेक मान्यवर मंडळीनी व जिल्हाभरातील रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शेवटच्या सादरीकरणापर्यंत कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कु. गोविंद माळगावकर, हेमंत खानोलकर, सोमा सावंत,तानाजी सावंत इ. यांचे विशेष सहाय्य लाभले.