
कुडाळ : सातत्याने दहशत वादाचा मुद्दा उपस्थित करून दिपक केसरकर राणेंच्या विरोधात लढले. दहशत वादाचे कारण पुढे करत ते राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेले. मग आता राणेंना भेटल्यावर तो दहशतवाद संपला का? असा प्रश्न उपस्थित करत केसरकर यांना निवडणूक जवळ आली की भाजपचे नेते आठवतात. अशा प्रकारची खरमरीत टीका दिपक केसरकर यांचे सावंतवाडी मतदारसंघातील प्रतिस्पर्धी भाजपच्या राजन तेली यांनी केली आहे.