
देवगड : देवगड शहरात हरितालिका व्रत भाद्रपद शुद्ध त्रयोदशी अर्थातच हरितालिका माता पूजन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. देवगड बाजारपेठेतील श्री नंदू मांगले कुटुंबीयांच्या निवासस्थानी ऐश्वर्या मांगले यांच्या यांच्यासह देवगड बाजारपेठेतील महिला भगिनी सुहासीनी यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्थानिक ग्रामोपाध्ये उदय जोशी यांच्या पौरोहीत्याखाली विधीवत पूजनाने हा सोहळा हरतालिका माता पूजन आरती गाऱ्हाणे इत्यादी धार्मिक विधीनी संपन्न झाला.










