बेळगावच्या मॅरेथॉन धावकांचं हरिश्चंद्र पवार यांनी केलं स्वागत

Edited by: विनायक गावस
Published on: August 07, 2023 12:08 PM
views 159  views

सावंतवाडी : कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील बेळगावी असोसिएशनच्या उच्चपदस्थ राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव ते आंबोली असा साठ किलो मीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी पहाटे ५ वाजता बेळगावहून निघालेली ही मॅरेथॉन आंबोली धबधबा येथे दुपारी दोन वाजता पोहोचली. या मॅरेथॉन मधील धावकांचे सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्यावतीने तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी स्वागत केले. यावेळी कुडाळ तालुका पत्रकार संघाच्या उपाध्यक्ष वैशाली खानोलकर सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष काका भिसे सदस्य विजय राऊत नरेंद्र देशपांडे महिला पोलिस निरीक्षक नदाफ, पोलीस दत्तात्रय देसाई आदी उपस्थित होते.