बोडदे खानयाळेत हरिश्चंद्र नाईक यांचा झंझावाती प्रचार !

बोडदे, खानयाळे व आवाडे गावांचा विकास हाच अजेंठा : हरिश्चंद्र नाईक
Edited by: संदीप देसाई
Published on: December 17, 2022 12:24 PM
views 175  views

दोडामार्ग : बोडदे, खानयाळे व आवाडे या तीन गावांच्या ग्रुप बोडदे ग्रुप ग्रामपंचायत निवडणूकित सरपंच पदाचे उमेदवार हरिश्चंद्र नाईक यांचा अंतिम टप्प्यातील झंजावती प्रचार लक्षवेधी ठरला आहे. तर गेली पाच वर्षे गावच्या विकासाचे व्हिजन घेऊन यशस्वी काम केलेल्या सरपंच विनायक शेटये यांचा खंबीर पाठिंबा असून या ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावातील जनतेने हरिश्चंद्र नाईक यांना आशीर्वाद दिल्याने नाईक यांचा विजय पक्का असल्याचा दावा  विद्यमान सरपंच विनायक शेटये यांनी व्यक्त केलाय.

   सरपंच म्हणून काम करताना बोडदे, खानयाळे व आवाडे तीन गावांचा सर्वांगीण विकासासाठी आम्ही झटणार असल्याने अभ्यासू उमेदवार हरिश्चंद्र नाईक मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास स्वतः सरपंच शेटये यांनी व्यक्त केलाय. हरिश्चंद्र नाईक हे गावपॅनलचे एक चांगले,जाणकार व सक्षम उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराला एवढा प्रतिसाद मिळतोय कि, हमखास तेच सरपंच पदी निवडून येतील. गावची सर्व कामे आम्ही आराखड्यात घेतलेली आहेत, त्यामुळं येत्या काळात ती सुद्धा पूर्ण केली जातील याची सर्वांनाच खात्री आहे. आतापर्यंत आम्ही केलेलं काम,  हाच आमचा विकासाचा अजेंडा राहील असंही विनायक शेट ये यांनी म्हटलं आहे.

 सामाजिक कार्याची आवड असल्याने गावाचा सर्वांगीण विकास हे एकच ध्येय समोर ठेऊन आपण निवडणूक लढवीत आहे असं सांगत विकास आराखडा त्यांनी जनतेसमोर ठेवला आहे. यात प्रामुख्याने गावात नियमितपणे पाणीपुरवठा, रस्त्यावर स्ट्रीट लाईटची सोय, आवश्यक ठिकाणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत रस्ते, खानयाळे, आवाडे, बोडदे गावासाठी हक्काची रुग्ण वाहिका सेवा, लोकांचा ग्रामसभेत प्रभावी सहभाग व ग्रामपंचायतमध्ये आपले म्हणणे मांडण्याचा पुर्ण अधिकार, निराधार सलेल्याना घरकुल योजना, नागरिकांच्या सूचनावर अमलबजावणी, बेरोजगारांना रोजगार आणि गाव सेवेसाठी आपण सदैव तत्पर राहणार असल्याचा अजेंडा मतदारांसमोर ठेवल्याने त्यांच्या प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे.